Wednesday 11 January 2017

युवा चेतना शिबिर

युवा चेतना शिबिराविषयी...



खूप लोक पुस्तके वाचतात पण पण काही माणसे ही वाचण्यासारखी असतात . माणसे वाचन म्हणजे काय असतं हा नवीन प्रकार समजून घेतलं विद्योदयने आयोजित केलेल्या दोन दिवसाचे २ रे र्जिल्हास्तरीय युवा चेतना शिबिरात !!!!
आयुष्यात काहीतरी वेगळे , काहीतरी चांगले करावे, स्वतःसाठी जगताना समाजासाठी सुद्धा काहीतरी करावे . असे खूप जनांना वाटत असते.पण काय करावे हे कळत नसते . कोणतेही जाहिरात न करता फक्त युवकांना प्रत्यक्ष भेटून शिबिराविषयी माहिती देण्यात आली . आणि कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातून ८० युवक- युवतींनी या शिबिराला उपस्थिती लावली. बऱ्याच युवकांना अशाप्रकारेचे हे पहिलेच शिबिर होते. प्रत्येकाच्या मनात सुरवातीला या शिबिरातून काय मिळणार आहे असे अनेक प्रश्न होते पण शिबिर संपल्या नतंर मला कशासाठी जागायचं आहे हे कळाले, मला काहीतरी समाजासाठी करायचा आहे,मला स्वत:ला सिद्ध करायचं आहे अशी मनोगते ऐकण्यावर हे शिबिर यशस्वी झाल्याची पोहोच पावती मिळाली.

हे शिबिर हि तसं खूप अनौपचारिक होत. वक्तानां कोणताही विषय तसा दिलेला नव्हता वक्त्याचा विषय म्हणजे काय त्यांनी केलेल्या कामाचे अनुभव कथन हाच शिबिराचे स्वरूप . अशा शिबिरासाठी मग असेच कर्मयोगी व्यक्तीना बोलवण्यात आलं होत. ज्यांनी समाजातील वेगवेगळ्या प्रश्नावर आपल आयुष्य वेचल आहे . अशी माणसं शोधन आम्हला थोडं कठीण केलं. पण जेव्हा आजूबाजूला पाहिलं तेव्हा अशी माणंस आपल्या जवळच आहेत असा अनुभव आला या सर्वाची जगणे, त्यांची जिद्द , निर्धार व अथक प्रत्नानी स्वप्ने साकार करण्याची धडपड त्याचे गोड , कडू अनुभव ऐकून खरच साऱ्या युवकांना चेतना मिळाली याची खात्री झाली.

आमचा हा छोटाचा प्रयन्त होता . पण या छोट्याशा प्रयत्नाला खूप मोठ्या लोकांनी कोणताही मानधन न घेता फक्त एका फोन कॅालवर हजेरी लावली. आपल्या व्यस्त जीवनशैलीतून त्यांनी आम्हला वेळ दिला. व आमच्या या प्रयत्नाला कौतुकाची थाप दिली यातच आम्ही धन्य झालो.

काही तरी खूप मनातून , तळमळीन करायचं ठरवलं ना तर सारा समाज आपल्या मदतीसाठी धावून येतो. याची पुन्हा एकदा प्रचीती आली. बर सगळचं चागलं लिहायचं म्हणुन नाही पण काही गोष्टी शिकायला हि मिळाल्या कोल्हापूर जिल्हाचे उच्चाआयुक्त गप्पा मारायला येणार आहेत तर त्यांना गाडी पाठवायची असते हे आमच्या उत्साही गटाला लक्षात आला नाही. आणि तुम्ही अजून का पोहचला नाही म्हुणन फोन केल्यावर ते म्हणाले मी तुमची वाट पाहत घरी बसलो आलो. आणि आमच्या गरीब टीम कडे चारचाकी गाडी कुणाकडेच नाही. मग गाडीसाठी झालेली धावपळ आमच्या चांगलीच लक्षात राहिली.
असो पण एकंदरीत काही चुका आणि त्यातून शिका हा मूलमंत्र आम्हला मिळाला.सगळ्यांना थोडं बहुत कळावं म्हणून काही शिकण व्यक्त करतोय. जे एक शिबिर संयोजक म्हूनन नाही तर एक शिबिरार्थी म्हणून 

१) सुनील स्वामी सर – अनिसच काम करतांना आलेले अनुभव सांगितले. युवक म्हणून आपण संविधान जगले पाहिजे हा अनुमोल ठेवा दिला . 

२) बागेश्री पोंक्षे ताई – अरुणाचा प्रदेश , उडीसा , शिरवळ, मावळ खोऱ्यातील अनुभव सांगताना अनेक युवक युवतीच्या डोळे पाणावले. व काहीतरी करण्यासाठी आपलं मुठी एवढ काळीज पेटलं पाहिजे हा संदेश दिला 

३) बाबासाहेब नदाफ – अनेक चळवळी , आंदोलने यातून ते कसे घडत गेले त्यातून त्यांचा जीवन प्रवास सांगितला. आंनदी जीवणासाठी पैसे लागत नाहीत हे त्याच्या जीवनातून कळाले.

४) इद्र्जीत देशमुख – प्रशासनात काम करताना आलेल्या अडचणी सांगत, त्यांना कशासाठी जगायचं हे महत्व सांगणारा पक्क्या आमच्या लक्षात राहिला.

५) पाटील सर – जो वाचतो त्याच मस्तक सुधारत व सुधारलेले मस्तक कुणासमोर नतमस्तक होत नाही हाच संदेश युवकांना मिळाला

हे सगळ खूप थोडक्यात लिहल आहे कारण पुढच्या वेळी तुम्हा सगळ्यांना या शिबिरासाठी यायचं आहे.
धन्यवाद

No comments:

Post a Comment