Wednesday 11 January 2017

प्रिंट मिडीयाने घेतली कामाची दखल - कोलाज



मागील वर्षी विविध वृत्त पत्रांनी विद्योदाच्या कामाची दखल घेतली ... 

युवा चेतना शिबिर

युवा चेतना शिबिराविषयी...



खूप लोक पुस्तके वाचतात पण पण काही माणसे ही वाचण्यासारखी असतात . माणसे वाचन म्हणजे काय असतं हा नवीन प्रकार समजून घेतलं विद्योदयने आयोजित केलेल्या दोन दिवसाचे २ रे र्जिल्हास्तरीय युवा चेतना शिबिरात !!!!
आयुष्यात काहीतरी वेगळे , काहीतरी चांगले करावे, स्वतःसाठी जगताना समाजासाठी सुद्धा काहीतरी करावे . असे खूप जनांना वाटत असते.पण काय करावे हे कळत नसते . कोणतेही जाहिरात न करता फक्त युवकांना प्रत्यक्ष भेटून शिबिराविषयी माहिती देण्यात आली . आणि कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातून ८० युवक- युवतींनी या शिबिराला उपस्थिती लावली. बऱ्याच युवकांना अशाप्रकारेचे हे पहिलेच शिबिर होते. प्रत्येकाच्या मनात सुरवातीला या शिबिरातून काय मिळणार आहे असे अनेक प्रश्न होते पण शिबिर संपल्या नतंर मला कशासाठी जागायचं आहे हे कळाले, मला काहीतरी समाजासाठी करायचा आहे,मला स्वत:ला सिद्ध करायचं आहे अशी मनोगते ऐकण्यावर हे शिबिर यशस्वी झाल्याची पोहोच पावती मिळाली.

हे शिबिर हि तसं खूप अनौपचारिक होत. वक्तानां कोणताही विषय तसा दिलेला नव्हता वक्त्याचा विषय म्हणजे काय त्यांनी केलेल्या कामाचे अनुभव कथन हाच शिबिराचे स्वरूप . अशा शिबिरासाठी मग असेच कर्मयोगी व्यक्तीना बोलवण्यात आलं होत. ज्यांनी समाजातील वेगवेगळ्या प्रश्नावर आपल आयुष्य वेचल आहे . अशी माणसं शोधन आम्हला थोडं कठीण केलं. पण जेव्हा आजूबाजूला पाहिलं तेव्हा अशी माणंस आपल्या जवळच आहेत असा अनुभव आला या सर्वाची जगणे, त्यांची जिद्द , निर्धार व अथक प्रत्नानी स्वप्ने साकार करण्याची धडपड त्याचे गोड , कडू अनुभव ऐकून खरच साऱ्या युवकांना चेतना मिळाली याची खात्री झाली.

आमचा हा छोटाचा प्रयन्त होता . पण या छोट्याशा प्रयत्नाला खूप मोठ्या लोकांनी कोणताही मानधन न घेता फक्त एका फोन कॅालवर हजेरी लावली. आपल्या व्यस्त जीवनशैलीतून त्यांनी आम्हला वेळ दिला. व आमच्या या प्रयत्नाला कौतुकाची थाप दिली यातच आम्ही धन्य झालो.

काही तरी खूप मनातून , तळमळीन करायचं ठरवलं ना तर सारा समाज आपल्या मदतीसाठी धावून येतो. याची पुन्हा एकदा प्रचीती आली. बर सगळचं चागलं लिहायचं म्हणुन नाही पण काही गोष्टी शिकायला हि मिळाल्या कोल्हापूर जिल्हाचे उच्चाआयुक्त गप्पा मारायला येणार आहेत तर त्यांना गाडी पाठवायची असते हे आमच्या उत्साही गटाला लक्षात आला नाही. आणि तुम्ही अजून का पोहचला नाही म्हुणन फोन केल्यावर ते म्हणाले मी तुमची वाट पाहत घरी बसलो आलो. आणि आमच्या गरीब टीम कडे चारचाकी गाडी कुणाकडेच नाही. मग गाडीसाठी झालेली धावपळ आमच्या चांगलीच लक्षात राहिली.
असो पण एकंदरीत काही चुका आणि त्यातून शिका हा मूलमंत्र आम्हला मिळाला.सगळ्यांना थोडं बहुत कळावं म्हणून काही शिकण व्यक्त करतोय. जे एक शिबिर संयोजक म्हूनन नाही तर एक शिबिरार्थी म्हणून 

१) सुनील स्वामी सर – अनिसच काम करतांना आलेले अनुभव सांगितले. युवक म्हणून आपण संविधान जगले पाहिजे हा अनुमोल ठेवा दिला . 

२) बागेश्री पोंक्षे ताई – अरुणाचा प्रदेश , उडीसा , शिरवळ, मावळ खोऱ्यातील अनुभव सांगताना अनेक युवक युवतीच्या डोळे पाणावले. व काहीतरी करण्यासाठी आपलं मुठी एवढ काळीज पेटलं पाहिजे हा संदेश दिला 

३) बाबासाहेब नदाफ – अनेक चळवळी , आंदोलने यातून ते कसे घडत गेले त्यातून त्यांचा जीवन प्रवास सांगितला. आंनदी जीवणासाठी पैसे लागत नाहीत हे त्याच्या जीवनातून कळाले.

४) इद्र्जीत देशमुख – प्रशासनात काम करताना आलेल्या अडचणी सांगत, त्यांना कशासाठी जगायचं हे महत्व सांगणारा पक्क्या आमच्या लक्षात राहिला.

५) पाटील सर – जो वाचतो त्याच मस्तक सुधारत व सुधारलेले मस्तक कुणासमोर नतमस्तक होत नाही हाच संदेश युवकांना मिळाला

हे सगळ खूप थोडक्यात लिहल आहे कारण पुढच्या वेळी तुम्हा सगळ्यांना या शिबिरासाठी यायचं आहे.
धन्यवाद

हस्ताक्षर सुधार अभियान




महाराष्ट्रातील ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थांचे खराब हस्ताक्षरांमुळे होणारी नुकसान ओळखून आपण हस्ताक्षर सुधार महाअभियाचे आयोजन केले . तरी कोल्हापूर जिल्हात पहिल्या टप्पात शिरोळ व हातकणंगले या तालुक्यातील ५०० विद्यार्थीचे हस्ताक्षर सुधार कार्यशाळा घेण्यात आल्या.



अक्षरवारी त्रिवेणी संगम- फिरते ग्रंथालय

अक्षरवारी त्रिवेणी संगम


विद्योदय मुक्तागण परिवार, कोल्हापूर , सेवा योग प्रतिष्ठान कराड व अनुलोम लोकराज्य अभियान याच्या मार्फत वाचन प्रेरणा दिनानिमित्त अक्षरवारी या फिरत्या ग्रथालायाचे उद्घाटन मा. सौ. प्रतिभा देशमुख याच्या अमृत हस्ते पार पडला. ग्रामीण भागात वाचन संस्कृती रुजावी हाच या फिरत्या ग्रंथालायचा उद्देश आहे.
सेवा योग प्रतिष्ठान कराड व अनुलोम लोकराज्य अभियान यांचे यासाठी दिलेले योगदान साठी मनपूर्वक आभार
.

संस्कार सेतू निवासी शिबिर



संस्कार सेतू
सेवा योग सामाजिक प्रतिष्ठान ही कराड मधील आपली सहयोगी संस्थेमार्फत संस्कार सेतू नावाने अतिशय दुर्गम भाग ,जिंती ( ता. पाटण, जि. सातारा ) येथील एका शाळेत ३ दिवशीय निवाशी शिबिर झाले.
या शिबिरात कला व विज्ञान हे विषय घेण्यात आला होता. विज्ञान या विषयाची सत्रे विद्योदय परिवारास देण्यात आली होती. ३ दिवस शिबिरात दाब व ध्वनी या विषयवार विविध प्रयोग व खेळण्यातून मुलांच्या वैज्ञानिक दृष्टीकोन , जिज्ञासा जागृत करण्याचा प्रयन्त करण्यात आला.
विद्यार्थीकडून येत असलेली उत्तरे भनाट होती.त्याच्या कडूनच आम्ही खूप काही शिकलो. त्याच्या बुद्धीमत्ता सलाम... चिखलातच कमळ उगवते याची प्रचीती जिंती या गावात आली.
सेवायोगी टीम चे आभार त्यांनी विद्योदय परिवारस ही संधी उपलब्ध करून दिली.

ग्रामीण जीवन कौशल्य विकास कार्यक्रम



Problem based learning



आपणास भूक लागते म्हणून जेवण मिळवण्यासाठी सगळे धडपड करत असतात. हा जीवन सृष्टीचा अलिखित नियम आहे. पण थोडा वेगळा विचार शिक्षण क्षेत्रात केला तर असे दिसून येते की सद्या मुलांना आपण जबरदस्तीने काही गोष्टी भरवत आहोत. किंवा असं म्हणता येईल त्यांना शिकण्याची भूक लागत नाही.मग ही शिकण्याची भूक कशी वाढवावी हा विचार झाला. तेव्हा त्या गोष्टीचा मूळ म्हणजे समस्यावर आधारित शिकणे  हा विचार झाला व समस्या आधारित शिक्षण सध्या  आम्ही  देण्याचा प्रयन्त करत आहोत. यासाठी कृतीतून शिक्षण हे तर वापरयचं आहेच. पण या कृती ला समस्येची जोड देणे हा प्रयन्त चालू आहे.

मग समस्या म्हणजे काय ? त्या सोडवण्यासाठी कोणत्या पद्धती वापराव्यात ? इथं पासून सुरुवात करून काही कृत्रिम समस्या तयार करून त्या मुलांकडून सोडवून घेण्याचा आम्ही प्रयन्त आहोत. उदा. मुलांना प्लस्टिक गाल्सचा पराशुट, कागदाच घर इ. त्यावर आधारित समस्या  देणे त्या सोडवण्यासाठी बौद्धिक क्षमता विकसीत करण्यासाठी आम्ही प्रयन्त करत आहोत. आमच्यासाठी सद्या  कोल्हापूर जिल्हातील सहा जिल्हापरिषद मराठी शाळेमध्ये हा उपक्रम सुरु आहे.हा उपक्रम राबताना बरेच चांगले वाईट अनुभव येत आहेत. 

समस्या या विषयाला सुरुवातीला करताना देश , राज्य व गाव व स्व:तच्या आयुष्यातील समस्या हे ब्रेन स्रामिंग मध्ये एका विद्यार्थाने  खाजगी शाळा वाढणे ही समस्या सांगितली मी त्याला  ही समस्या का वाटते असा प्रतीप्रश्न केला तेव्हा समजले.तेव्हा तो म्हणला आम्ही खाजगी शाळेची फी देवू शकत नाही त्यामुळे सरकारी शाळेत शिकतो गेल्यावर्षी माझे बरेच मित्र ही शाळा सोडून गेलेत म्हूनण मला ही समस्या वाटते. अस उत्तर त्याने दिले. त्यां मुलाने त्याच्या भावना व्यक्त केल्या. मग आम्हला कामाची  नेमकी दिशा दिसू लागली आहे.

दोन दिवशीय कार्यशाळेने गुणवत्ता वाढ होणार नाही हे नक्की आहे. पण ती शाळा आमच्या प्रकल्पाला पूरक आहे की हीच प्राथमिक पाहणी या दोन दिवशीय कार्यशाळेतून करता आली. आता दीर्घ काळातील कार्यक्रम लवकरच या ग्रामीण सरकारी  शाळामध्ये सुरु करून  गुणवत्ता विकास घडवून आणणे च पुढील ध्येय. !!!

धन्यवाद !!!    



घे भरारी


जानेवारी २०१७ 



Tuesday 10 January 2017

साहित्य लेखन कार्यशाळा


बऱ्याच वेळा मुलांना परीक्षेमध्ये निबंध लिहा, पत्र लिहा इ. प्रश्न विचारून मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळावा असा प्रयन्त केला जातो. पण सद्या इतकं सारं तयार साहित्य बाजारात उपलब्ध झाले आहे की ते पाठ करूनच मुले परीक्षेत लिहित असतात. मग खरच विचार करावासा वाटतो मुलांची प्रतिभा या पाठांतरातून विकसत होणार का ? हे पाठ करून मुल लेखक, कवी होणार का ? ते आपले विचार मुक्त पणे लोकांसमोर ठेवू शकणार का ? की उसने शब्द पाठ करतील ? या सगळ्या प्रश्नाला उत्तर म्हणून आम्ही ज्ञान प्रबोधितच्या छात्र प्रबोधन या अंकाच्या रोप्य महोत्सवचे अवचित्त साधून साहित्य लेखन कार्यशाळा भरवली. इचलकरंजी, अब्दुल लाट व लाटवाटी ३ गावातील इच्छुक ७० मुलांनी या कार्यशाळेला उपस्थिती लावली.
कार्यशाळा कोठे घ्यायची असा विचार झाला तेव्हा अब्दुल लाट मधील अनाथ मुलांच्या बालोद्यान वसतिगृहात घेवूया असा निर्णय झाला कारण बाकीचे मुले सुद्धा या अनाथ मुलांशी गप्पा मारतील नवे मित्र बनवतील व आपलं व त्याचं आयुष्य जवळून पाहतील हा उद्देश सिद्ध झाला कारण जेव्हा कार्यशालेच्या शेवटी एक मुलीने अनाथ मुले या विषयावर कविता लिहिली.
शब्दाचे खेळ खेळत मुलांनी आपल्या प्रतिभेला बाहेर काढण्याचा प्रयन्त केला. चार ओळीची यमक कविता करतांना मुलांनी खूप मज्जा केली. त्या कवितेना गहरा अर्थ नव्हता किंवा त्या खूप वैचारिकही नव्हत्या पण त्यांनी स्वतः लिहिलेल्या चार ओळी वाचून दाखवताना मुलांच्या चेहऱ्यावरचा स्वनिर्मितचा आनंद पाहून कार्यशाळा घेण्याचा उद्देश सफल झाला अस म्हणायला हरकत नाही.
साखरेत दुध म्हणून मुलांनी ग्रामीण कवी इद्रजित भालेराव  यांच्याशी फोन वरून गप्पा मारल्या.इद्रजित सरांना त्यांची बाप ही कविता गाऊन त्या कवितेच्या आठवणी सांगितल्या. गावातील युवा कवींनी समारोप प्रसंगी आपल्या कविता सादर केल्या.
साहित्या लेखन कार्यशाळेचा आमचा पहिला प्रयन्त यशस्वी झाला असचं म्हणता येईल

सेवांकुर साखर शाळा पालक मिटिंग

नको तोडू माझी शाळा..
.
ऊस तोडणी कामगाराच्या मुलांसाठी साखर शाळा सुरु करून आता महिना होत आला. मुलांसाठी आम्ही करत असलेले कार्य म्हणजे त्या मुलांची शिक्षणातील गोडी टिकवून ठेवणे. त्यासाठी सद्या तरी कृतियुक्त अध्यापन पद्धती,तंत्रज्ञाचा वापर करण्यात येत आहे. पण मुलांच्या घडणीसाठी फक्त शाळा काढून उपयोग नाही. शिक्षणाचे महत्व मुलांच्या पालकांनाही समजलं पाहिजे.त्यांचाही वाटा या मुल घडणीच्या प्रकीयेमध्ये खूप महत्वचा आहे याची जाणीव त्यांना करून देण खूप गरजेचं आहे. म्हणून या मुलांच्या पालकांसाठी या साऱ्या गोष्टीची चर्चा व्हावी म्हणून पालक सभेचा आयोजन करायचं असं ठरवलं गेलं.
बऱ्याच शाळेच्या पालक सभामध्ये पालकांची संख्या खूप कमी असते.कारण पालकांना अशा मिटिंग साठी वेळ नसतो. आणि साखर शाळेच्या मुलाच्या पालकांसाठी पालक सभा आयोजित करण म्हणजे एक मोठं आव्हन होत. कारण या मुलांचे पालक हे आपल्या पालावरून सूर्य उगवयच्या आधी ऊस तोडायला जातात व सूर्य मावळ्यावर परत येतात. मग कशी घ्यायची पालक सभा ? तर त्याच्या वेळेनुसार रात्री ८.०० ते १०.०० शी पालक सभेची वेळ निश्चित झाली. या कामगारांना पालक सभेला या सांगून ते येणार नाहीत.मग त्यासाठी युक्ती म्हणून शिक्षणाचे महत्व सांगणारा, आपल्या गरीब परिस्थितीवर मात करून आपल्या मुलीला शिकणाऱ्या बाप व मुलीचा तानी हा मराठी सिनेमा दाखवायचं असं ठरवलं गेलं. आणि इंटरवल मध्ये पालकाशी संवाद साधता येईल असा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला.
८०- ९० ऊस तोडी मजुर ला पालक सभेसाठी उपस्थित होते .आमच्या टीम साठी ही आनंदाची गोष्ट होती. पाहिलास शो हाउस फुल. इंटरवल मध्ये पालकाशी साधलेला सवांद खूप महत्वाचा ठरला. आणि सिनेमाच इतका मार्मिक होता. की शिक्षणासाठी लढणाऱ्या तानीला पाहून सगळ्याचं पालकांचे डोळे ओले झाले. आम्ही आमच्या मुला- मुलीला शाळा शिकणार अशी ग्वाही त्यांनी शेवटी दिली. आणि आमची पालक सभा यशस्वी झाली.

चैतन्य प्रेरणा पुरस्कार

केल्याने देशाटन ... सृजन यात्रा !!!

                                                     केल्याने देशाटन  !!!

माझ्या नजरेतून....सृजन यात्रा..
( ८  ऑक्टोबर ते १४ ऑक्टोंबर २०१६ )
भेटीची ठिकाणे – वर्धा गांधी आश्रम, नई तालीम, पवनार आश्रम, वरोरा आनंदवन, हेमलकसा लोकबिरादरी प्रकल्प, गडचिरोली- शोधग्राम, लेखामेंढा इ.)  

खरंच अनुभव शिक्षणाला गांधी व विनोबानी खूप महत्व देले.हे अनुभव घेण्यासाठी गांधी व विनोबांनी तसेच   इतर  अनेक समाजसेवकांनी देशाटन केलं. जे त्यांनी पाहिलं त्यावर विचार केला.  आणि आपलं सामाजिक, राजकीय, आध्यात्मिक व शैक्षणिक कामची सुरुवात केली. आपला इतिहास पहिला तर कितीतरी अशी उदाहरण आपल्याला देशाटनातून मिळालेल्या अनुभवरुपी शिदोरी च्या रूपाने कार्यस उतरली.परिव्राजक विवेकानंद असो, स्वातंत्र्यवीर सावकार असो, घटनेचे शिल्पकार बाबासाहेब  आंबेडकर असो अशी शेकडो नावे घेता येतील .  असे कितीतरी लोकांनी देशाटन केले.तेथील परिस्थितीचा अभ्यास केला. व त्यांना त्याच्या जीवानाचे सूत्र , ध्येय गवसले.

सृजन यात्रा हा देशाटन घडवून आणयासाठीचा छोटासा प्रयन्त सेवायोग प्रतिष्ठान ,कराड या सामाजिक संस्थेतेने घडवून आणला. गांधी विचारातून  तयार झालेली सेवाग्राम येथील नई तालीम,गांधी आश्रम, तसेच विनोबाच्या विचारातून तयार झालेला  पवनार आश्रम  ही तीर्थस्थान पाहिली . व तसेच गांधी, विनोबाच्या विचारातून प्रेरणा घेवून श्रद्धेय बाबा आमटे यांची कर्मभूमी असलेल्या वरोरा येथील आनंदवन व हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्प,  अभय बंग व राणी बंग यांनी सुरु केलेल्या गडचिरोलीमधील शोधग्राम (सर्च) हा प्रकल्प, व  शेवटी मुंबई, दिल्लीत आमचं सरकार, आमच्या गावात आम्हीच सरकार” म्हणून जगाने ज्या गावाची नोंद घेतली असे मेंढालेखा गाव अशी सृजन यात्रा केली.

गांधीजी , विनोबानी  आपला शिक्षण विचार सांगताना  अनुभव शिक्षणाला खुप महत्व देले. एखादी गोष्ट पुस्तकात वाचून कळते.त्यापेक्षा जास्त ती अनुभवातून जगता येते. या यात्रेतून तो जगण्याचा अनुभव मिळाला. बाबा आमटेच कार्य पुस्तकात वाचालं होत.ते वाचून एक एशोआरामत जगणारा, विदेशी सिनेमाच्या दिग्दर्शकांना पत्र लिहून अभिप्राय देणाऱ्या मुरलीधर आमटे ते साऱ्या महारोग्यांना एकत्र करून, त्यांना स्वाभिमानी जीवन जगायाचा अधिकार देवून  त्याचं आनंदवन फुलवणारे व अनेक निराधारचे व वंचिताचे  बाबा हा प्रवास आनंदवन पाहिल्यावरच कळतो. जेथे हात,पाय झडलेली बोटे कल्पकता व श्रम करून आनंदी जीवन  जगताना पाहून मन भरून येते.

बाबाच्या या मानवसेवेचं व्रत जगणारे, त्यांच्या आठवणी न सांगता त्यांचा वारसा लीलया पेलणारे विकासभाऊ व प्रकाशभाऊ हे सध्याच्या युवकांचा खरे प्रेरणास्थान बनले आहेत. विकासभाऊनी आमच्या गटाशी मारलेल्या मनसोक्त गप्पा आनंदवन हे प्रयोगवन कसे आहे हे सिद्ध केलं . येथे २००० लोकांच एकचं रेशनकार्ड हे एवंढ मोठं कुटुंब आता समर्थपणे चालवताना येणाऱ्या अडचणी विकासभाऊनी सांगितल्या. मी नावासाठी काम करत नाही मी माझ्यासाठी काम करतो हे सांगून आनंदवन सध्या काय करत आहे याची प्रचीती दिली.

प्रकाश भाऊ हे परत असचं प्रेरणास्थान. डॅा. प्रकाश बाबा आमटे हा सिनेमा पाहून किंवा प्रकाशवाटा पुस्तक वाचून हेमलकसा लोकबिरादरी प्रकल्प  कधी कळत नाही. माणूस कितीही मोठा झाला. त्याला कितीही  नामांकित पुरस्कारनी सन्मानित केलं तरीही त्याच्या कार्यासमोर हे सार फिक पडत. प्रकाश भाऊ व मंदाकनी ताई हे असचं  सेवाव्रती जोडप. म्हणजे पेहरावापासून, बोलण, चालण  आणि मिस्कील हसण हे सगळचं साधं. प्रकाशभाऊशी गप्पा मारताना घरातील व्यक्तीशी बोलतोय की काय हाच भास. इतकी आपुलकी पहिल्याच भेटीत कळते. त्याचं प्राण्यांचं अनाथालय हा एक वेगळा विषय. प्राण्यांना स्पर्शाची भाषा कळते आणि तो स्पर्श हा आध्यात्मिक( मनुष्य सेवा) कार्यचा असेल तर अजून भारी. हे त्या प्राणी अनाथालयत गेल्यावर कळत.अशा कितीतरी अनुभव आम्ही त्या सेवाभूमीत घेतले.

अभय बंग व राणी बंग यांचा गडचिरोली मधील शोधग्राम ( Search ) या एक योजक कामच रूप पाहायला मिळाले. बंग जोडप्यांनी केलेल्या कामाची दखल केन्द्र शासन, नियोजन मंडळ  का घेत हे याचा अनुभव तेथील परिसरात गेल्यावर कळते. निर्माण प्रकल्पद्वारे  युवकामध्ये करत असलेल काम हे तर प्रेरणादायी होत. अनेक युवकांना निर्माण मुळे जगण्याचे ध्येय गवसले. व ते सामाजिक क्षेत्रात भरीव काम करत आहेत.हेच सर्च केलेल्या कामची खरी ओळख बनेल यात शंका नाही.मेंडा लेखा गावाबद्दल बद्दल सांगायचं तर लोकशाहीच जगातील एक उत्तम उदाहरण म्हणता येईल. आमचे हक्क आम्ही मिळवू. बहुमत न विचारात घेता एकमत घेवून गावाचा विकास करू हा गांधी, विनोबाचा विचार जगताना खऱ्या ग्रामराज्याची कल्पना  तेथे पाहायला मिळाली.



 सृजनयात्रेचा प्रवास करताना तितकीच जिवाभावाची अनेक नाती जोडली गेली. रातोरात होण्याऱ्या गप्पातून अनेक सामजिक प्रश्नाचे चिंतन झाले. नवी उमेद, नवी आशा निर्माण झाल्या. आपण आपल्या आजूबाजूचा जग सुंदर करूया बाकीच जग आपोआप सुंदर होईल असा निर्धार पक्का झालंय.  शेवटी मला एवढेच म्हणावेसे वाटते.
आयुष्य खूप सुंदर आहे, अनुभव तुला सांगत जाईल,
प्रयत्न करायला विसरू नकोस, मार्ग तुला सापडत जाईल.
    
आपला , 
विनायक माळी ..
विद्योदय मुक्तांगण परिवार, कोल्हापूर
धन्यवाद !!!