Tuesday 30 May 2017

युवा चेतना शिबीर(निवासी)-२०१७


   युवा चेतना शिबीर(निवासी)-२०१७
 मी कडून...आम्ही कडे नेणारा रोमांचकारी प्रवास...

विद्योदय मुक्तांगण परिवारमार्फत दरवर्षी युवा चेतना निवासी शिबिराचे आयोजन केले जाते.. हे शिबिराचे ३ रे वर्ष होते..

खूप लोक पुस्तके वाचतात पण पण काही माणसे ही वाचण्यासारखी असतात .आयुष्यात काही तरी वेगळे, काहीतरी चांगले करावे, स्वतःसाठी जगताना समाजासाठीसुद्धा काहीतरी करावे असे बऱ्याच जणांना वाटत असते

आजच्या युवकांना प्रशासकीय, उद्योजक, संरक्षक व शेती क्षेत्रात यशस्वी झालेल्या व उत्तम कार्य करत असलेल्या व्यक्तीचा जीवन प्रवास समजावा, त्यांचा युवकांशी सवांद व्हावा व त्यांतून युवकांना जीवन जगण्याची दिशा मिळावी या हेतूने युवा चेतना शिबीराचे आयोजन करण्यात आले . हे दोन दिवशीय निवासी शिबीर दि.२७ व २८ मे २०१७ रोजी बालोद्यान या वसतिगृहात पार पडले. सदर शिबीरामध्ये ५० युवकांचा समावेश होता. शिबीराचा थोडक्यात वृत्तांत पुढील प्रमाणे
 वकांना सामाजिक
दिवस पहिला २७ मे , २०१७
    शिबिराचा दिवस म्हणजेच शनिवार २७ मे उजाडला. हळू-हळू शिबिरार्थींची नोंदणी सुरु झाली.१०.३० पर्यंत नोंदणी करून सर्व दादा-ताई बालोद्यान मध्ये एकत्र जमले. ओंकाराने शिबिराची सुरुवात झाली. विनायक दादाने एक खेळ घेतला त्या खेळामध्ये सर्वांची ओळख झाली..


 पहिले सत्र -  मा. बाबासाहेब नदाफ
अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे ज्यांनी संपूर्ण भारतभर व्याख्यानासाठी प्रवास करणारे राष्ट्र सेवा दलाचे महामंत्री, हेरवाड गावचे सुपुत्र मा.बाबासाहेब नदाफ सर यांचे हेरवाड सारख्या लहान गावातून जन्म घेवून राष्ट्र सेवा दलाचे महामंत्री असा प्रवास सरांनी ठेवला. त्यांची समजाप्रती असणारी तळमळ, तिहार जेल मध्ये त्यांची साजरी केलेली भगतसिंगची जयंती असा सगळा प्रवास एकूण सगळे साजरी केलेली माहिती दिली. लहानपणी केलेला संघर्ष यापासुन नक्कीच प्रेरणा मिळाली.



दुसरे सत्र- सौ पद्मावती संजय गिरमल
  आपल्या स्वकर्तुत्वाने आज त्या लाट गावातील यशस्वी आधुनिक महिला शेतकरी म्हणून परिचित आहेत..एखादे ध्येय ठरवायचे व ते पूर्ण करण्यासाठी खुप कष्ट करायचे हा मूलमंत्र त्यांनी सर्व दादा-ताईंना दिला. शेती व्यवसाय हा महत्वाचा आहे. जर डोक वापरून शेती केली तर त्याच्या सारखे उत्पन्नाचे साधन नाही अशी नवी दिशा त्यांनी युवकांना  दिली.



पारंपारिक खेळ -

जे खेळ कुठेतरी काळाच्या आड हरवत चालले आहेत असे खेळ सर्वांनी मिळून गटा-गटामध्ये खेळले .खेळामध्ये विटी-दांडू, लगोरी, रस्सीखेच या खेळांचा समावेश होता.सगळ्यांना आपले बालपण आठवले.



तिसरे सत्र – मा.इंद्रजीत देशमुख व गोरख माळी सर
      

सर्व जण या सत्राची आतुरतेने वाट पाहत होते..कारण होते हि तसेच. ज्यांना आम्ही आदर्श स्थानी मानतो,आपल्या अमृत वाणीने सर्वांना मंत्रमुग्ध करणारे,प्रशासनातील एक जबाबदार अधिकारी,काकाजी म्हणजेच डॉ.इंद्रजीत देशमुख (अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी,जि. प.,कोल्हापूर) आणि त्यांच्या सोबत होते आयर्न मॅन हा सन्मान दोनवेळा प्राप्त करणारे गोरख माळी सर काकाजी व माळी सरांनी आपला जीवनप्रवास सर्वांसमोर मांडला.. या सत्रासाठी 7 वर्षाच्या बालकापासून ते 70 वर्षाच्या युवकापर्यंत सर्वांनी हजेरी लावली होती..त्यामध्ये आपले लाडके पण तितकेच शिस्तप्रिय असणारे मुख्याद्यापक गडकरी सर,साहित्यिक कुरुंदवाडे सर हे युवक युवा शिबिरासाठी आवर्जून उपस्थित होते..सलगतीन तास सगळे एका जागी खिळून होते..


मनोरंजन सत्र -
      रात्री भोजन करून परत दुसऱ्या दिवसाची तयारी करण्यासाठी सर्वजण एकत्र जमलो. तयारी झाल्यानंतर अक्षय दादांनी आपल्या कवितेने सर्वांना भारावून सोडले..


दुसरा दिवस- रविवार २८ मे

 एरोबिक  -
  सकाळी ठीक ६ वाजता नदाफ सर बालोद्यान मध्ये हजर होते.. सरांनी सर्वांना अप्रतिम पध्द्तीने एरोबिक शिकवले. संगीताच्या तलावार व्यायाम करताना युवकांनी खूप आनंद घेतला. सरांनी  व्यायाम व एरोबिक चे महत्व सांगितले.






लाटी काटी व दांडपट्टा प्रशिक्षण -गावातील देवा फौंडेशन मार्फत लाठी-काठी व दांडपट्टा यांचे प्रात्यक्षिक व प्रशिक्षण फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रतिक चौगुले यांनी अप्रतिम पद्धतीने दिले.लाटी व दांडपट्टा मुलीच्या हाती भारी शोभत होत्या.२१ शतकातल्या रणरणरागिणी जणू...

    



श्रमदान – बालोद्यान च्या परिसराची स्वच्छता करण्यात आली व बालोद्याच्या मुलाच्या सायकली ठेवण्यासाठी मोडकळीस आलेला पत्राचा शेड दुरुस्त करण्यात आला . त्यानंतर श्रमदान करून झाल्यावर आवरून नाष्टा करून सर्वजण १०.०० वाजता एकत्र जमलो.




प्रभातभेरी  -
युवा शक्तीचे महत्व सांगणारी , युवकांना दिशा देणारी घोषवाक्ये लिहून गावात प्रभातफेरी काढण्यात आली.युवा वर्गाला संघटित करण्यासाठी विविध घोषणा देण्यात आल्या.





 सत्र चौथे - बळवंत नायकूडे व श्रीकांत प्रभुदेसाई  
  सामाजिक उद्योजकता यासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी इचलकरंजीचे प्रसिद्ध उद्योजक मा.श्रीकांत प्रभू देसाई सर व लाटेतील गुरुकुल इंग्लिश मेडिअम स्कुलचे संस्थापक-अध्यक्ष मा.गणेश नायकुडे सर उपस्थित होते... दोघांनी आपला जीवनप्रवास सांगितला..
आपण व्यवसाय करत समाजसेवा करू शकतो. व नोकरीच्या मागे लागण्यापेक्षा आपण नोकरी देणारे बनले पाहिजे हा मुलंमंत्र त्यांनी दिला.

सत्र पाचवे – अभिजित कुंभोजे
अब्दुल लाट गावातील संरक्षण क्षेत्रात कार्यरत असेलले अभिजित कुंभोजे व त्यांच्या साथीदारांनी संरक्षण क्षेत्रातील संधी सांगितल्या व सद्या संरक्षण क्षेत्रात कमी मनुष्यबळ असलेल्या अडचणी सांगितल्या. वर्दी चढवल्यावर मिळणार आत्मविश्वास व देशाप्रती असणारे प्रेम पाहुन युवकांनी त्यांना सलामी दिली.



समारोप वेळी अनेकांनी आप-आपली मनोगत व्यक्त केली. बऱ्याच युवकांना अशाप्रकारेचे  हे पहिलेच शिबिर होते. ..प्रत्येक वक्त्यांचा जीवनप्रवास त्यांच्या तोंडून ऐकायला मिळाला.प्रत्येकाच्या मनात सुरवातीला या शिबिरातून काय मिळणार आहे असे अनेक प्रश्न   होते पण शिबिर संपल्या नतंर मला कशासाठी जागायचं आहे हे कळाले, मला काहीतरी समाजासाठी करायचा,मला स्वत:ला सिद्ध करायचं आहे अशी मनोगते ऐकण्यावर  हे शिबिर यशस्वी झाल्याची पोहोच पावती मिळाली. सुहासदादानी विद्योदयचा आजपर्यंतचा प्रवास सांगितला..विनायक दादांनी सर्वांचे आभार मानले..

अनिकेत मधाळे




विद्योदय मुक्तांगण परिवार










                                                 

1 comment: