सेवांकुर साखर शाळा - पालक मिटिंग

नको तोडू माझी शाळा..
.
ऊस तोडणी कामगाराच्या मुलांसाठी साखर शाळा सुरु करून आता महिना होत आला. मुलांसाठी आम्ही करत असलेले कार्य म्हणजे त्या मुलांची शिक्षणातील गोडी टिकवून ठेवणे. त्यासाठी सद्या तरी कृतियुक्त अध्यापन पद्धती,तंत्रज्ञाचा वापर करण्यात येत आहे. पण मुलांच्या घडणीसाठी फक्त शाळा काढून उपयोग नाही. शिक्षणाचे महत्व मुलांच्या पालकांनाही समजलं पाहिजे.त्यांचाही वाटा या मुल घडणीच्या प्रकीयेमध्ये खूप महत्वचा आहे याची जाणीव त्यांना करून देण खूप गरजेचं आहे. म्हणून या मुलांच्या पालकांसाठी या साऱ्या गोष्टीची चर्चा व्हावी म्हणून पालक सभेचा आयोजन करायचं असं ठरवलं गेलं.
बऱ्याच शाळेच्या पालक सभामध्ये पालकांची संख्या खूप कमी असते.कारण पालकांना अशा मिटिंग साठी वेळ नसतो. आणि साखर शाळेच्या मुलाच्या पालकांसाठी पालक सभा आयोजित करण म्हणजे एक मोठं आव्हन होत. कारण या मुलांचे पालक हे आपल्या पालावरून सूर्य उगवयच्या आधी ऊस तोडायला जातात व सूर्य मावळ्यावर परत येतात. मग कशी घ्यायची पालक सभा ? तर त्याच्या वेळेनुसार रात्री ८.०० ते १०.०० शी पालक सभेची वेळ निश्चित झाली. या कामगारांना पालक सभेला या सांगून ते येणार नाहीत.मग त्यासाठी युक्ती म्हणून शिक्षणाचे महत्व सांगणारा, आपल्या गरीब परिस्थितीवर मात करून आपल्या मुलीला शिकणाऱ्या बाप व मुलीचा तानी हा मराठी सिनेमा दाखवायचं असं ठरवलं गेलं. आणि इंटरवल मध्ये पालकाशी संवाद साधता येईल असा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला.
८०- ९० ऊस तोडी मजुर ला पालक सभेसाठी उपस्थित होते .आमच्या टीम साठी ही आनंदाची गोष्ट होती. पाहिलास शो हाउस फुल. इंटरवल मध्ये पालकाशी साधलेला सवांद खूप महत्वाचा ठरला. आणि सिनेमाच इतका मार्मिक होता. की शिक्षणासाठी लढणाऱ्या तानीला पाहून सगळ्याचं पालकांचे डोळे ओले झाले. आम्ही आमच्या मुला- मुलीला शाळा शिकणार अशी ग्वाही त्यांनी शेवटी दिली. आणि आमची पालक सभा यशस्वी झाली.

No comments:

Post a Comment