साहित्य लेखन कार्यशाळा.


बऱ्याच वेळा मुलांना परीक्षेमध्ये निबंध लिहा, पत्र लिहा इ. प्रश्न विचारून मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळावा असा प्रयन्त केला जातो. पण सद्या इतकं सारं तयार साहित्य बाजारात उपलब्ध झाले आहे की ते पाठ करूनच मुले परीक्षेत लिहित असतात. मग खरच विचार करावासा वाटतो मुलांची प्रतिभा या पाठांतरातून विकसत होणार का ? हे पाठ करून मुल लेखक, कवी होणार का ? ते आपले विचार मुक्त पणे लोकांसमोर ठेवू शकणार का ? की उसने शब्द पाठ करतील ? या सगळ्या प्रश्नाला उत्तर म्हणून आम्ही ज्ञान प्रबोधितच्या छात्र प्रबोधन या अंकाच्या रोप्य महोत्सवचे अवचित्त साधून साहित्य लेखन कार्यशाळा भरवली. इचलकरंजी, अब्दुल लाट व लाटवाटी ३ गावातील इच्छुक ७० मुलांनी या कार्यशाळेला उपस्थिती लावली.
कार्यशाळा कोठे घ्यायची असा विचार झाला तेव्हा अब्दुल लाट मधील अनाथ मुलांच्या बालोद्यान वसतिगृहात घेवूया असा निर्णय झाला कारण बाकीचे मुले सुद्धा या अनाथ मुलांशी गप्पा मारतील नवे मित्र बनवतील व आपलं व त्याचं आयुष्य जवळून पाहतील हा उद्देश सिद्ध झाला कारण जेव्हा कार्यशालेच्या शेवटी एक मुलीने अनाथ मुले या विषयावर कविता लिहिली.
शब्दाचे खेळ खेळत मुलांनी आपल्या प्रतिभेला बाहेर काढण्याचा प्रयन्त केला. चार ओळीची यमक कविता करतांना मुलांनी खूप मज्जा केली. त्या कवितेना गहरा अर्थ नव्हता किंवा त्या खूप वैचारिकही नव्हत्या पण त्यांनी स्वतः लिहिलेल्या चार ओळी वाचून दाखवताना मुलांच्या चेहऱ्यावरचा स्वनिर्मितचा आनंद पाहून कार्यशाळा घेण्याचा उद्देश सफल झाला अस म्हणायला हरकत नाही.
साखरेत दुध म्हणून मुलांनी ग्रामीण कवी इद्रजित भालेराव  यांच्याशी फोन वरून गप्पा मारल्या.इद्रजित सरांना त्यांची बाप ही कविता गाऊन त्या कवितेच्या आठवणी सांगितल्या. गावातील युवा कवींनी समारोप प्रसंगी आपल्या कविता सादर केल्या.
साहित्या लेखन कार्यशाळेचा आमचा पहिला प्रयन्त यशस्वी झाला असचं म्हणता येईल

No comments:

Post a Comment