Sunday 17 September 2023

बालशिक्षणाच्या प्रयोगशाळा

बालशिक्षणाच्या प्रयोगशाळा

मागील आठवड्यात विद्योदय कोअर टीमचा तीन दिवसांचा अभ्यास दौरा पालघर जिल्ह्यातील Quest, ग्राममंगल व  ,बाल ग्राम शिक्षा केंद्र या तीन  संस्थेचा झाला. बालशिक्षणात उत्तम काम करणाऱ्या या भारतातील काही अग्रगण्य संस्था आहेत. त्याचा थोडक्यात वृत्तात.

दिवस पहिला - 11 सप्टेंबर ,2023 

Quest -Quality Education support Trust -

महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध शिक्षण तज्ञ निलेश निमकर सर यांच्या Quest संस्थेची भेट...

कोल्हापूर - ठाणे - वाडा - सोनाळे असा बसचा 10 तासांचा प्रवास करत आम्ही सोनाळे गावात पोहचलो. आमच्याच वयाच्या हिमानी ताई आम्हला पुढील दोन दिवस Quest चं काम दाखवणार होत्या. हिमानी ताई रत्नागिरी जिल्ह्यातील, गेल्या वर्षी त्यांनी ताराबाई मोडक फेलोशिप पूर्ण केली . काम आवडलं म्हणून आता त्या याचं फेलोशिप कार्यक्रमाच्या समनव्यक म्हणून काम पाहतात. त्यांच्याशी बोलताना सहज प्रश्न विचारला ताई तुमचे पुढील प्लन काय आहेत. तर त्यांनी उत्तर दिलं. Life time Quest बरोबर काम करण्याची इच्छा आहे. इतका चांगला अनुभव माझा आहे. ताईच्या या उत्तरामुळे Quest च्या कामाचं culture लक्षात आलं.  इथं लोक नोकरीसाठी येतं नाहीत तर कामातुन मिळणाऱ्या आनंदासाठी , समाधानासाठी येतात हे ताईच्या बोलण्यातून लक्षात आले.

पालवी प्रकल्प - हिमानी ताईंनी आम्हाला Quest चा   पालवी प्रकल्प  दाखवला . जो अंगणवाडी सेविकांच्या क्षमता संवर्धनासाठी खास तयार केला आहे. गर्द झाडीतून , निमुळत्या वाटेने आम्ही एका आदिवासी पाड्यावर चालू असणाऱ्या अंगणवाडीला भेट दिली . ममता ताई तिथं मुलांना शिकवत होत्या. सोबत पालवी प्रकल्पाचा संतोष दादा तिथं ताईंनी मदतीसाठी उपस्थित होता. फक्त प्रशिक्षण न देता प्रत्यक्ष वर्गातील मदतीवर भर हे Questच्या कामाचे वेगळेपण आम्हाला जाणवले .समोर 10 -12 मुले ममता ताई समोर होती. या अंगणवाडी वर्गाची रचना खूप वेगळी होती. जागोजागी वेगवेगळ्या सूचना देणारे पोस्टर लावले होते. इथे सुशोपण करूया , चपला रांगेत काढुया, गिरगीट फळा ,बाहुली घर , मुक्त खेळ कोपरा , हवामान आलेख ,दैनिक नियोजन इ. अनेक बाबीनी संपूर्ण वर्ग सजला होता.ममता ताई अतिशय आत्मविश्वास पूर्वक मुलांशी संवाद साधत होत्या. अनेक शैक्षणिक साधनांचा वापर अंगवाडीत केला जाऊ शकतो . व मुलांना अतिशय सूंदर शैक्षणिक अनुभव देता येतात व हे 1 तासाच्या निरीक्षणातून आम्हला समजले. 

बालभवन प्रकल्प  - 

हिमाई ताईंनी सोबत आमच्या सर्वांचा जेवणाचा डब्बा आणला होता. रात्रभर बसचा प्रवास त्यामुळे दुपारी डोळ्यात झोप होती . आता जेवण करून थोडं कुठंतरी आडवं होऊ (झोपू ) असा विचार मनात असताना हिमानी ताईंनी आम्हला चला आता बालभवनचा वर्ग बघूया ! म्हणून आम्हाला जाग केल . कामात बदल हीच विश्रांती हे कदाचित ताईंनी माहीत असावं बहुतेक. एका आश्रमच्या परिसरात मैदानातील एका कोपऱ्यात दोन कंटेनर होते. इथे बालभवनातील मुलांचे वर्ग भरतात . इयत्ता 1 ली ते 4 थी च्या मुलांनी आपल्या शाळेच्या वेळातील पाऊण तास या बालभवन यायचं व कृतीयुक्त भाषा व गणिताचा तास अभ्यास  वर्गाची रचना पालवी प्रकल्पातील अंगणवाडी सारखीच पण प्रत्येक गोष्टीचा स्थर हा वाढवलेला. बालभवनातील दादा 3 री च्या  मुलाना शाब्दीक उदाहरण शिकवत होता.  मुलांना प्रत्यक्ष विविध कृती करून , विविध साधनांचा वापर करून तो दादा गणित शिकवत होता. प्रत्येक मुलांला संकल्पना समजली पाहिजे  हे त्याच्या शिकवण्याचे सूत्र होते.


 

अनुपद सक्षम प्रकल्प

बालभवनचा  तास पाहिल्यावर आम्ही त्याच आश्रम शाळेतील इयत्ता 5 वी ते 7 वी च्या भाषा व गणित विषयात मागे असणाऱ्या मुलांचा सक्षम प्रकल्पाचा तास पहिला . भाषा व गणितात मागे याचा अर्थ असा नव्हे की फक्त लिहण्या वाचण्यातील अडचण ,गणितातील अंकओळख , मूलभूत क्रिया असा न घेता. मराठी भाषा म्हणून मुले समृद्ध झाली पाहिजे . गणित संकल्पना कृतीतुन स्पष्ट झाल्या पाहिजेत. मुले भाषा व गणितात सक्षम झाली पाहिजेत असाच तेथील ताई दादांच्या बोलण्यातून आम्हाला समजले.

दिवसभर भटकंती करून गर्द झाडीतून प्रवास करत आम्ही शेवटी Quest च्या सोनाळे येथील ऑफिस मध्ये पोहोचलो. चहापान झाल्यावर Quest ने विविध प्रकल्पासाठी  तयार केलेल्या  शैक्षणिक साधने ,पुस्तके यांचे प्रदर्शन आमच्यासाठी लावले  होते. कोणताही कार्यक्रम तेव्हाच समृद्ध होतो जेव्हा त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तयार झालेलं  ज्ञान पुढच्या पुढीला साहित्य रूपांने उपलब्ध होते. Quest ने प्रत्येक कार्यक्रमाचे उत्तम दर्जेजाचे साहित्य शैक्षणिक साहित्य व पुस्तके यांची निर्मिती केली आहे ..दिवसभराचा वृत्तांत आम्ही नितीन विशे सरांना सांगितला व आमचा पहिला दिवस पूर्ण झाला .

क्रमश: 

आपला 

विनायक 

१७ जुलै , २०२३ 





2 comments:

  1. 👌सुंदर आणि सविस्तर वृतांत लेखन केले आहे. लेखनामुळे अनेकांना या संस्थेविषयी माहिती मिळेल. जे शैक्षणिक काम कारतात त्यांना ही उपयुक्त ठरेल.

    ReplyDelete