Tuesday 10 January 2017

केल्याने देशाटन ... सृजन यात्रा !!!

                                                     केल्याने देशाटन  !!!

माझ्या नजरेतून....सृजन यात्रा..
( ८  ऑक्टोबर ते १४ ऑक्टोंबर २०१६ )
भेटीची ठिकाणे – वर्धा गांधी आश्रम, नई तालीम, पवनार आश्रम, वरोरा आनंदवन, हेमलकसा लोकबिरादरी प्रकल्प, गडचिरोली- शोधग्राम, लेखामेंढा इ.)  

खरंच अनुभव शिक्षणाला गांधी व विनोबानी खूप महत्व देले.हे अनुभव घेण्यासाठी गांधी व विनोबांनी तसेच   इतर  अनेक समाजसेवकांनी देशाटन केलं. जे त्यांनी पाहिलं त्यावर विचार केला.  आणि आपलं सामाजिक, राजकीय, आध्यात्मिक व शैक्षणिक कामची सुरुवात केली. आपला इतिहास पहिला तर कितीतरी अशी उदाहरण आपल्याला देशाटनातून मिळालेल्या अनुभवरुपी शिदोरी च्या रूपाने कार्यस उतरली.परिव्राजक विवेकानंद असो, स्वातंत्र्यवीर सावकार असो, घटनेचे शिल्पकार बाबासाहेब  आंबेडकर असो अशी शेकडो नावे घेता येतील .  असे कितीतरी लोकांनी देशाटन केले.तेथील परिस्थितीचा अभ्यास केला. व त्यांना त्याच्या जीवानाचे सूत्र , ध्येय गवसले.

सृजन यात्रा हा देशाटन घडवून आणयासाठीचा छोटासा प्रयन्त सेवायोग प्रतिष्ठान ,कराड या सामाजिक संस्थेतेने घडवून आणला. गांधी विचारातून  तयार झालेली सेवाग्राम येथील नई तालीम,गांधी आश्रम, तसेच विनोबाच्या विचारातून तयार झालेला  पवनार आश्रम  ही तीर्थस्थान पाहिली . व तसेच गांधी, विनोबाच्या विचारातून प्रेरणा घेवून श्रद्धेय बाबा आमटे यांची कर्मभूमी असलेल्या वरोरा येथील आनंदवन व हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्प,  अभय बंग व राणी बंग यांनी सुरु केलेल्या गडचिरोलीमधील शोधग्राम (सर्च) हा प्रकल्प, व  शेवटी मुंबई, दिल्लीत आमचं सरकार, आमच्या गावात आम्हीच सरकार” म्हणून जगाने ज्या गावाची नोंद घेतली असे मेंढालेखा गाव अशी सृजन यात्रा केली.

गांधीजी , विनोबानी  आपला शिक्षण विचार सांगताना  अनुभव शिक्षणाला खुप महत्व देले. एखादी गोष्ट पुस्तकात वाचून कळते.त्यापेक्षा जास्त ती अनुभवातून जगता येते. या यात्रेतून तो जगण्याचा अनुभव मिळाला. बाबा आमटेच कार्य पुस्तकात वाचालं होत.ते वाचून एक एशोआरामत जगणारा, विदेशी सिनेमाच्या दिग्दर्शकांना पत्र लिहून अभिप्राय देणाऱ्या मुरलीधर आमटे ते साऱ्या महारोग्यांना एकत्र करून, त्यांना स्वाभिमानी जीवन जगायाचा अधिकार देवून  त्याचं आनंदवन फुलवणारे व अनेक निराधारचे व वंचिताचे  बाबा हा प्रवास आनंदवन पाहिल्यावरच कळतो. जेथे हात,पाय झडलेली बोटे कल्पकता व श्रम करून आनंदी जीवन  जगताना पाहून मन भरून येते.

बाबाच्या या मानवसेवेचं व्रत जगणारे, त्यांच्या आठवणी न सांगता त्यांचा वारसा लीलया पेलणारे विकासभाऊ व प्रकाशभाऊ हे सध्याच्या युवकांचा खरे प्रेरणास्थान बनले आहेत. विकासभाऊनी आमच्या गटाशी मारलेल्या मनसोक्त गप्पा आनंदवन हे प्रयोगवन कसे आहे हे सिद्ध केलं . येथे २००० लोकांच एकचं रेशनकार्ड हे एवंढ मोठं कुटुंब आता समर्थपणे चालवताना येणाऱ्या अडचणी विकासभाऊनी सांगितल्या. मी नावासाठी काम करत नाही मी माझ्यासाठी काम करतो हे सांगून आनंदवन सध्या काय करत आहे याची प्रचीती दिली.

प्रकाश भाऊ हे परत असचं प्रेरणास्थान. डॅा. प्रकाश बाबा आमटे हा सिनेमा पाहून किंवा प्रकाशवाटा पुस्तक वाचून हेमलकसा लोकबिरादरी प्रकल्प  कधी कळत नाही. माणूस कितीही मोठा झाला. त्याला कितीही  नामांकित पुरस्कारनी सन्मानित केलं तरीही त्याच्या कार्यासमोर हे सार फिक पडत. प्रकाश भाऊ व मंदाकनी ताई हे असचं  सेवाव्रती जोडप. म्हणजे पेहरावापासून, बोलण, चालण  आणि मिस्कील हसण हे सगळचं साधं. प्रकाशभाऊशी गप्पा मारताना घरातील व्यक्तीशी बोलतोय की काय हाच भास. इतकी आपुलकी पहिल्याच भेटीत कळते. त्याचं प्राण्यांचं अनाथालय हा एक वेगळा विषय. प्राण्यांना स्पर्शाची भाषा कळते आणि तो स्पर्श हा आध्यात्मिक( मनुष्य सेवा) कार्यचा असेल तर अजून भारी. हे त्या प्राणी अनाथालयत गेल्यावर कळत.अशा कितीतरी अनुभव आम्ही त्या सेवाभूमीत घेतले.

अभय बंग व राणी बंग यांचा गडचिरोली मधील शोधग्राम ( Search ) या एक योजक कामच रूप पाहायला मिळाले. बंग जोडप्यांनी केलेल्या कामाची दखल केन्द्र शासन, नियोजन मंडळ  का घेत हे याचा अनुभव तेथील परिसरात गेल्यावर कळते. निर्माण प्रकल्पद्वारे  युवकामध्ये करत असलेल काम हे तर प्रेरणादायी होत. अनेक युवकांना निर्माण मुळे जगण्याचे ध्येय गवसले. व ते सामाजिक क्षेत्रात भरीव काम करत आहेत.हेच सर्च केलेल्या कामची खरी ओळख बनेल यात शंका नाही.मेंडा लेखा गावाबद्दल बद्दल सांगायचं तर लोकशाहीच जगातील एक उत्तम उदाहरण म्हणता येईल. आमचे हक्क आम्ही मिळवू. बहुमत न विचारात घेता एकमत घेवून गावाचा विकास करू हा गांधी, विनोबाचा विचार जगताना खऱ्या ग्रामराज्याची कल्पना  तेथे पाहायला मिळाली.



 सृजनयात्रेचा प्रवास करताना तितकीच जिवाभावाची अनेक नाती जोडली गेली. रातोरात होण्याऱ्या गप्पातून अनेक सामजिक प्रश्नाचे चिंतन झाले. नवी उमेद, नवी आशा निर्माण झाल्या. आपण आपल्या आजूबाजूचा जग सुंदर करूया बाकीच जग आपोआप सुंदर होईल असा निर्धार पक्का झालंय.  शेवटी मला एवढेच म्हणावेसे वाटते.
आयुष्य खूप सुंदर आहे, अनुभव तुला सांगत जाईल,
प्रयत्न करायला विसरू नकोस, मार्ग तुला सापडत जाईल.
    
आपला , 
विनायक माळी ..
विद्योदय मुक्तांगण परिवार, कोल्हापूर
धन्यवाद !!!



1 comment:

  1. मुलांच्या भावविश्वासोबत त्यांच्या भावी जीवनोपयोगी उपक्रम राबवले आहेत,मुक्तांगण या नावाप्रमाणेच एक मुक्त व्यासपीठ तुमी मुलांना उपलब्ध करून दिले आहे,मला खूप आवडले हे तुमचे उपक्रम. शालेय शिक्षणाबरोबरच त्यांना व्यावसायिक शिक्षण दिल्यामुळे मुले खरच स्वावलंबी बनतील,वेगवेगळ्या कला आत्मसात करतील,तुमच्या पुढील कार्याला शुभेच्छा

    ReplyDelete