सप्तरंगी ईशान्य भारत 2013

दिनांक २१ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर २०१३ — हे सात दिवस आम्ही चार मित्रांना भारताच्या ईशान्य भागात *‘ज्ञान सेतू’* या ज्ञान प्रबोधिनीच्या उपक्रमातून जाण्याची संधी मिळाली. खरंच, हा भारताचा पूर्व भाग म्हणजेच जणू काही वेगळंच जग! भारताचा हा सगळ्यात पूर्वेकडील राज्य — *अरुणाचल प्रदेश* — जिथे सूर्य सगळ्यात आधी उगवतो! उंच डोंगररांगा, सगळीकडे हिरवळ, अंगाला झोंबणारा थंड वारा, आणि मधून वाहणाऱ्या दिबांग, सुबनसिरी, लोहित, कामेंग, तिराप या ब्रह्मपुत्रेच्या वेगवान उपनद्या... अखंड वाहणारी ब्रह्मपुत्रा नदी! नद्यांची नावे जशी वेगळी, तशीच त्यांची उच्चारायची पद्धतही अनोखी — आम्ही उच्चार करायचा म्हटलं की ते दोन वेळा तोच शब्द पुन्हा म्हणायला लावायचे! तिथली हिंदीसुद्धा वेगळी — प्रत्येक वाक्याचा शेवट “ना” ने होणारा — *“हो जायेगा ना!”* ऐकायला मजेशीर वाटायचं, कधी हासूसुद्धा यायचं! पण शेवटी आम्ही सुद्धा त्यांच्यासारखंच हिंदी बोलायला लागलो. जेवणात तर अजूनच नाविन्य! नाश्त्याला भात, दुपारी भात, रात्री भात — म्हणजे तिथे *“खाना” म्हणजे भातच!* मात्र सामिष भोजनाची चंगळ तेथे सर्वत्र दिसते. रस्ते म्हणजे डोंगरातून जाणाऱ्या...