Wednesday 1 February 2017

सेवांकुर साखर शाळेची सहल..


सेवांकुर साखर शाळेची सहल..

आपल्या साखर शाळेतील मुलांची सहल देशाचं एक अपूर्व देणगी असणाऱ्या खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर व अब्दुल लाट गावातच वंचित मुलांच्या शिक्षणासाठी उभं असलेलं बालोद्यान या वसतिगृहात काढु असं आमच्या टीम ने ठरवलं .
सकाळी ठीक ९.०० वाजता एकत्र या असं सगळ्यांना सांगितलं होतं पण मुलांची उत्सूकता इतकी होती ती सकाळी ७.०० वाजल्यापासून शाळेच्या ठिकाणी उभी होती .कारण विचारल्यावर विठ्ठल म्हणाला "आई बाबा सकाळी ५ .०० ला ऊस तोडायला गेल्यात आज मी सहलीला जाणार हाय म्हणून आईनं नवे कपडे घातलेत व बाबानं अत्तर लावलय अंगाला येतो का वास.....?"
आम्हाला भारी वाटलं पण काहीजण  सहलीला जाता येणार नाही म्हणून खोपित रडत असताना दिसले.आईनं सांगितलेलं खोपित शेळी हाय तिला सोडून जायचं नाय तिला चारा पाणी करायचं आणि लहान भाऊ पण हाय त्याला सांभाळायचं. या लहान वयात त्या मुलांना आलेलं ही जबाबदारी पाहून त्याचं खेळण्या बागडयांनाच वय कुठंतरी हरवताना दिसलं.                                                                                                                                  प्रत्यक्ष २० आली. पाहिल्यादा बालोद्यान भेट घेतली . तेथील मुलांशी संवाद साधला. संपूर्ण बालोद्यान मुलांनी पाहिलं इथं कोण राहायला येणार का असं प्रश्न विचारल्यावर सत्यपाल म्हणाला "मला याचाच पण बाप लावून देणारा नाही" मग काय परत तोच प्रश्न सत्यपाल जर या वस्तीगृहात राहिला तर पुढच्या हंगामाला शेळी कोण सांभाळणार. आणि ऊसाची मोळी कोण बांधणारया प्रश्नची उत्तर कदाचित सत्यपाल कडेच असावीत म्हणून त्याने तसं उत्तर दिलं असावं .बालोद्यान च्या मुलांनी गाणी गाऊन दाखवली .व त्याला उत्तर म्हणून साखर शाळेच्या मुलांनीही गाणी म्हटली.आम्ही फक्त गाणी ऐकत होतो.बस मध्ये
बरीच जागा शिल्लक होती वेळी बालोद्यान मधील १० मुलांन घेऊन बस खिद्रापुरकडे जाण्यासाठी निघालो .  मूलं खूप आनंदी झाली होती. त्यांचा उत्साह गाण्यामधून दिसून येत.

खिद्रपुरला पोहचल्यावर मुलांनी केळीबिस्किटचिरुमुरे यावर ताव मारला . अतिशय अप्रतिम कलाकृती असलेले कोपेश्वर मंदिर मुलांना पाहण्यात काहीच रस नव्हता. दादा मला मंदिरातील घंटा वाजवायची आहे . असं प्रत्येकानी घंटा वाजवली त्यांना मंदिरातील  देवापेक्षा तेथील आता मध्ये असणाऱ्या वटवाघळे पाहण्यात जास्त मज्जा आली. खिद्रापुरचे मंदिरे हा ग्रंथ लिहलेला शशांक दादा चोथे यांनी मुलांना रुचेल अशा शब्दात मंदिराचा इतिहास सांगितला. मंदिर पाहून या असं सांगितलं व परत मुलानं पडलेल्या प्रश्नाची उत्तरे दिली.मंदिराबद्दल पूर्ण     कोपेश्वर   मंदिर ही कृष्णा नदीच्या घाटावर वसले       आहे  .  त्यामुळे नदीचा किनारी फेरफटका             मारण्यासाठी    आम्ही गेलो . सगळ्यांची पाण्यात हात पाय धुवून    घेतले . इतक्यात मुलांना एक होडी त्या किनाऱ्यावर    येताना दिसली . दादा मला होडीत बसायचं आहे    आम्ही एकदा पण होडीत बसलो नाही.अस सुप्रिया    तिच्या कानडी हेल मराठीत बोलली व सगळ्यांनीच    सूर लावला .मग सगळेच होडीत बसले .थोड भीतच    सगळे होडित चढले,. ”दादा होडीत मी पहिल्याच    बसलो भीती वाटत होती पण सगळे असल्यामुळे भीती पळून गेली ”. अस विशाल शेवटी म्हणाला अशा प्रकारे गटात असणाता भीत पळून जाते त्या  कृष्णा माईन कदाचित विशालला पण सांगितलं. तेथील जेवण व्यवस्था काही शिक्षक मित्रांनी अतिशय उत्तम पद्धतीने केली होती. हे सार शक्य झालं कारण आपण सहलीसाठी केलेली मदत व आमच्यावर दाखवलेला विश्वास व तो असाच कायम राहावा.








No comments:

Post a Comment