Posts

Showing posts from January, 2017

प्रिंट मिडीयाने घेतली कामाची दखल - कोलाज

Image
मागील वर्षी विविध वृत्त पत्रांनी विद्योदाच्या कामाची दखल घेतली ... 

युवा चेतना शिबिर

Image
युवा चेतना शिबिराविषयी... खूप लोक पुस्तके वाचतात पण पण काही माणसे ही वाचण्यासारखी असतात . माणसे वाचन म्हणजे काय असतं हा नवीन प्रकार समजून घेतलं विद्योदयने आयोजित केलेल्या दोन दिवसाचे २ रे र्जिल्हास्तरीय युवा चेतना शिबिरात !!!! आयुष्यात काहीतरी वेगळे , काहीतरी चांगले करावे, स्वतःसाठी जगताना समाजासाठी सुद्धा काहीतरी करावे . असे खूप जनांना वाटत असते.पण काय करावे हे कळत नसते . कोणतेही जाहिरात न करता फक्त युवकांना प्रत्यक्ष भेटून शिबिराविषयी माहिती देण्यात आली . आणि कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातून ८० युवक- युवतींनी या शिबिराला उपस्थिती लावली. बऱ्याच युवकांना अशाप्रकारेचे हे पहिलेच शिबिर होते. प्रत्येकाच्या मनात सुरवातीला या शिबिरातून काय मिळणार आहे असे अनेक प्रश्न होते पण शिबिर संपल्या नतंर मला कशासाठी जागायचं आहे हे कळाले, मला काहीतरी समाजासाठी करायचा आहे,मला स्वत:ला सिद्ध करायचं आहे अशी मनोगते ऐकण्यावर हे शिबिर यशस्वी झाल्याची पोहोच पावती मिळाली. हे शिबिर हि तसं खूप अनौपचारिक होत. वक्तानां कोणताही विषय तसा दिलेला नव्हता वक्त्याचा विषय म्हणजे काय त्यांनी केलेल्या कामाचे अनुभव कथन ...

हस्ताक्षर सुधार अभियान

Image
महाराष्ट्रातील ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थांचे खराब हस्ताक्षरांमुळे होणारी नुकसान ओळखून आपण हस्ताक्षर सुधार महाअभियाचे आयोजन केले . तरी कोल्हापूर जिल्हात पहिल्या टप्पात शिरोळ व हातकणंगले या तालुक्यातील ५०० विद्यार्थीचे हस्ताक्षर सुधार कार्यशाळा घेण्यात आल्या.

अक्षरवारी त्रिवेणी संगम- फिरते ग्रंथालय

Image
अक्षरवारी त्रिवेणी संगम विद्योदय मुक्तागण परिवार, कोल्हापूर , सेवा योग प्रतिष्ठान कराड व अनुलोम लोकराज्य अभियान याच्या मार्फत वाचन प्रेरणा दिनानिमित्त अक्षरवारी या फिरत्या ग्रथालायाचे उद्घाटन मा. सौ. प्रतिभा देशमुख याच्या अमृत हस्ते पार पडला. ग्रामीण भागात वाचन संस्कृती रुजावी हाच या फिरत्या ग्रंथालायचा उद्देश आहे. सेवा योग प्रतिष्ठान कराड व अनुलोम लोकराज्य अभियान यांचे यासाठी दिलेले योगदान साठी मनपूर्वक आभार .

संस्कार सेतू निवासी शिबिर

Image
संस्कार सेतू सेवा योग सामाजिक प्रतिष्ठान ही कराड मधील आपली सहयोगी संस्थेमार्फत संस्कार सेतू नावाने अतिशय दुर्गम भाग ,जिंती ( ता. पाटण, जि. सातारा ) येथील एका शाळेत ३ दिवशीय निवाशी शिबिर झाले. या शिबिरात कला व विज्ञान हे विषय घेण्यात आला होता. विज्ञान या विषयाची सत्रे विद्योदय परिवारास देण्यात आली होती. ३ दिवस शिबिरात दाब व ध्वनी या विषयवार विविध प्रयोग व खेळण्यातून मुलांच्या वैज्ञानिक दृष्टीकोन , जिज्ञासा जागृत करण्याचा प्रयन्त करण्यात आला. विद्यार्थीकडून येत असलेली उत्तरे भनाट होती.त्याच्या कडूनच आम्ही खूप काही शिकलो. त्याच्या बुद्धीमत्ता सलाम... चिखलातच कमळ उगवते याची प्रचीती जिंती या गावात आली. सेवायोगी टीम चे आभार त्यांनी विद्योदय परिवारस ही संधी उपलब्ध करून दिली.

ग्रामीण जीवन कौशल्य विकास कार्यक्रम

Image
Problem based learning आपणास भूक लागते म्हणून जेवण मिळवण्यासाठी सगळे धडपड करत असतात. हा जीवन सृष्टीचा अलिखित नियम आहे. पण थोडा वेगळा विचार शिक्षण क्षेत्रात केला तर असे दिसून येते की सद्या मुलांना आपण जबरदस्तीने काही गोष्टी भरवत आहोत. किंवा असं म्हणता येईल त्यांना शिकण्याची भूक लागत नाही.मग ही शिकण्याची भूक कशी वाढवावी हा विचार झाला. तेव्हा त्या गोष्टीचा मूळ म्हणजे समस्यावर आधारित शिकणे  हा विचार झाला व समस्या आधारित शिक्षण सध्या  आम्ही  देण्याचा प्रयन्त करत आहोत. यासाठी कृतीतून शिक्षण हे तर वापरयचं आहेच. पण या कृती ला समस्येची जोड देणे हा प्रयन्त चालू आहे. मग समस्या म्हणजे काय ? त्या सोडवण्यासाठी कोणत्या पद्धती वापराव्यात ? इथं पासून सुरुवात करून काही कृत्रिम समस्या तयार करून त्या मुलांकडून सोडवून घेण्याचा आम्ही प्रयन्त आहोत. उदा. मुलांना प्लस्टिक गाल्सचा पराशुट, कागदाच घर इ. त्यावर आधारित समस्या  देणे त्या सोडवण्यासाठी बौद्धिक क्षमता विकसीत करण्यासाठी आम्ही प्रयन्त करत आहोत. आमच्यासाठी सद्या  कोल्हापूर जिल्हातील सहा जिल्हापरिषद मराठी शाळेमध...

घे भरारी

Image
जानेवारी २०१७ 

साहित्य लेखन कार्यशाळा

Image
बऱ्याच वेळा मुलांना परीक्षेमध्ये निबंध लिहा, पत्र लिहा इ. प्रश्न विचारून मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळावा असा प्रयन्त केला जातो. पण सद्या इतकं सारं तयार साहित्य बाजारात उपलब्ध झाले आहे की ते पाठ करूनच मुले परीक्षेत लिहित असतात. मग खरच विचार करावासा वाटतो मुलांची प्रतिभा या पाठांतरातून विकसत होणार का ? हे पाठ करून मुल लेखक, कवी होणार का ? ते आपले विचार मुक्त पणे लोकांसमोर ठेवू शकणार का ? की उसने शब्द पाठ करतील ? या सगळ्या प्रश्नाला उत्तर म्हणून आम्ही  ज्ञान प्रबोधितच्या छात्र प्रबोधन या अंकाच्या रोप्य महोत्सवचे अवचित्त साधून साहित्य लेखन कार्यशाळा भरवली. इचलकरंजी, अब्दुल लाट व लाटवाटी ३ गावातील इच्छुक ७० मुलांनी या कार्यशाळेला उपस्थिती लावली. कार्यशाळा कोठे घ्यायची असा विचार झाला तेव्हा अब्दुल लाट मधील अनाथ मुलांच्या बालोद्यान वसतिगृहात घेवूया असा निर्णय झाला कारण बाकीचे मुले सुद्धा या अनाथ मुलांशी गप्पा मारतील नवे मित्र बनवतील व आपलं व त्याचं आयुष्य जवळून पाहतील हा उद्देश सिद्ध झाला कारण जेव्हा कार्यशालेच्या शेवटी एक मुलीने अनाथ मुले या विषयावर कविता लिहिली. शब्दाचे खे...

सेवांकुर साखर शाळा पालक मिटिंग

Image
नको तोडू माझी शाळा.. . ऊस तोडणी कामगाराच्या मुलांसाठी साखर शाळा सुरु करून आता महिना होत आला. मुलांसाठी आम्ही करत असलेले कार्य म्हणजे त्या मुलांची शिक्षणातील गोडी टिकवून ठेवणे. त्यासाठी सद्या तरी कृतियुक्त अध्यापन पद्धती,तंत्रज्ञाचा वापर करण्यात येत आहे. पण मुलांच्या घडणीसाठी फक्त शाळा काढून उपयोग नाही. शिक्षणाचे महत्व मुलांच्या पालकांनाही समजलं पाहिजे.त्यांचाही वाटा या मुल घडणीच्या प्रकीयेमध्ये खूप महत्वचा आहे याची जाणीव त्यांना करून देण खूप ग रजेचं आहे. म्हणून या मुलांच्या पालकांसाठी या साऱ्या गोष्टीची चर्चा व्हावी म्हणून पालक सभेचा आयोजन करायचं असं ठरवलं गेलं. बऱ्याच शाळेच्या पालक सभामध्ये पालकांची संख्या खूप कमी असते.कारण पालकांना अशा मिटिंग साठी वेळ नसतो. आणि साखर शाळेच्या मुलाच्या पालकांसाठी पालक सभा आयोजित करण म्हणजे एक मोठं आव्हन होत. कारण या मुलांचे पालक हे आपल्या पालावरून सूर्य उगवयच्या आधी ऊस तोडायला जातात व सूर्य मावळ्यावर परत येतात. मग कशी घ्यायची पालक सभा ? तर त्याच्या वेळेनुसार रात्री ८.०० ते १०.०० शी पालक सभेची वेळ निश्चित झाली. या कामगारांना पालक सभेला या सां...

चैतन्य प्रेरणा पुरस्कार

Image
Image
केल्याने देशाटन ... सृजन यात्रा !!!                                                      केल्याने देशाटन  !!! माझ्या नजरेतून....सृजन यात्रा .. ( ८  ऑक्टोबर ते १४ ऑक्टोंबर २०१६ ) भेटीची ठिकाणे – वर्धा गांधी आश्रम, नई तालीम, पवनार आश्रम, वरोरा आनंदवन, हेमलकसा लोकबिरादरी प्रकल्प, गडचिरोली- शोधग्राम, लेखामेंढा इ.)   खरंच अनुभव शिक्षणाला गांधी व विनोबानी खूप महत्व देले.हे अनुभव घेण्यासाठी गांधी व विनोबांनी तसेच   इतर  अनेक समाजसेवकांनी देशाटन केलं. जे त्यांनी पाहिलं त्यावर विचार केला.  आणि आपलं सामाजिक, राजकीय, आध्यात्मिक व शैक्षणिक कामची सुरुवात केली. आपला इतिहास पहिला तर कितीतरी अशी उदाहरण आपल्याला देशाटनातून मिळालेल्या अनुभवरुपी शिदोरी च्या रूपाने कार्यस उतरली.परिव्राजक विवेकानंद असो, स्वातंत्र्यवीर सावकार असो, घटनेचे शिल्पकार बाबासाहेब  आंबेडकर असो अशी शेकडो नावे घेता येतील .  असे किती...