Posts

Showing posts from 2023

बालशिक्षणाच्या प्रयोगशाळा

Image
बालशिक्षणाच्या प्रयोगशाळा मागील आठवड्यात विद्योदय कोअर टीमचा तीन दिवसांचा अभ्यास दौरा पालघर जिल्ह्यातील Quest, ग्राममंगल व  ,बाल ग्राम शिक्षा केंद्र या तीन  संस्थेचा झाला. बालशिक्षणात उत्तम काम करणाऱ्या या भारतातील काही अग्रगण्य संस्था आहेत. त्याचा थोडक्यात वृत्तात. दिवस पहिला - 11 सप्टेंबर ,2023  Quest -Quality Education support Trust - महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध शिक्षण तज्ञ निलेश निमकर सर यांच्या Quest  संस्थेची भेट... कोल्हापूर - ठाणे - वाडा - सोनाळे असा बसचा 10 तासांचा प्रवास करत आम्ही सोनाळे गावात पोहचलो. आमच्याच वयाच्या हिमानी ताई आम्हला पुढील दोन दिवस Quest चं काम दाखवणार होत्या. हिमानी ताई रत्नागिरी जिल्ह्यातील, गेल्या वर्षी त्यांनी ताराबाई मोडक फेलोशिप पूर्ण केली . काम आवडलं म्हणून आता त्या याचं फेलोशिप कार्यक्रमाच्या समनव्यक म्हणून काम पाहतात. त्यांच्याशी बोलताना सहज प्रश्न विचारला ताई तुमचे पुढील प्लन काय आहेत. तर त्यांनी उत्तर दिलं. Life time Quest बरोबर काम करण्याची इच्छा आहे. इतका चांगला अनुभव माझा आहे. ताईच्या या उत्तरामुळे Quest च्या कामाचं culture लक...