युवा चेतना शिबीर(निवासी)-२०१७
युवा चेतना शिबीर(निवासी)-२०१७ मी कडून...आम्ही कडे नेणारा रोमांचकारी प्रवास.. . विद्योदय मुक्तांगण परिवारमार्फत दरवर्षी युवा चेतना निवासी शिबिराचे आयोजन केले जाते.. हे शिबिराचे ३ रे वर्ष होते.. खूप लोक पुस्तके वाचतात पण पण काही माणसे ही वाचण्यासारखी असतात .आयुष्यात काही तरी वेगळे, काहीतरी चांगले करावे, स्वतःसाठी जगताना समाजासाठीसुद्धा काहीतरी करावे असे बऱ्याच जणांना वाटत असते . आजच्या युवकांना प्रशासकीय, उद्योजक, संरक्षक व शेती क्षेत्रात यशस्वी झालेल्या व उत्तम कार्य करत असलेल्या व्यक्तीचा जीवन प्रवास समजावा, त्यांचा युवकांशी सवांद व्हावा व त्यांतून युवकांना जीवन जगण्याची दिशा मिळावी या हेतूने युवा चेतना शिबीराचे आयोजन करण्यात आले . हे दोन दिवशीय निवासी शिबीर दि.२७ व २८ मे २०१७ रोजी बालोद्यान या वसतिगृहात पार पडले. सदर शिबीरामध्ये ५० युवकांचा समावेश होता. शिबीराचा थोडक्यात वृत्तांत पुढील प्रमाणे वकांना सामाजिक दिवस पहिला २७ मे , २०१७ शिबिराचा दिवस म्हणजेच शनिवार २७ मे उजाडला. हळू-हळू शिबिरार्थींची नोंदणी सुरु...