Posts

Showing posts from February, 2017

The Hindu Newspaper covered our stroy

http://www.thehindu.com/news/cities/mumbai/Not-by-rote-it%E2%80%99s-all-about-learning-through-fun-and-games/article17308565.ece

सेवांकुर साखर शाळेची सहल..

Image
सेवांकुर साखर शाळेची सहल.. आपल्या साखर शाळेतील मुलांची सहल देशाचं एक अपूर्व देणगी असणाऱ्या खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर व अब्दुल लाट गावातच वंचित मुलांच्या शिक्षणासाठी उभं असलेलं बालोद्यान या वसतिगृहात काढु असं आमच्या टीम ने ठरवलं . सकाळी ठीक   ९.०० वाजता एकत्र या असं सगळ्यांना सांगितलं होतं पण मुलांची उत्सूकता इतकी होती ती सकाळी ७.०० वाजल्यापासून शाळेच्या ठिकाणी उभी होती .कारण विचारल्यावर विठ्ठल म्हणाला  " आई बाबा सकाळी ५ .०० ला ऊस तोडायला गेल्यात आज मी सहलीला जाणार हाय म्हणून आईनं नवे कपडे घातलेत व बाबानं अत्तर लावलय अंगाला येतो का वास..... ?" आम्हाला भारी वाटलं पण काहीजण    सहलीला जाता येणार नाही म्हणून खोपित रडत असताना दिसले.आईनं सांगितलेलं खोपित शेळी हाय तिला सोडून जायचं नाय तिला चारा पाणी करायचं आणि लहान भाऊ पण हाय त्याला सांभाळायचं. या लहान वयात त्या मुलांना आलेलं ही जबाबदारी पाहून त्याचं खेळण्या बागडयांनाच वय कुठंतरी हरवताना दिसलं.                                ...