
पाऊली चालती मेळघाट ची वाट !!! सृजन यात्रा – २०१७ माहित नाही पण मला मेळघाट ने जीवनाचा मेळ कशात आहे याची जाणीव करून दिली तर घाट सांगून गेला तूला आयुष्यची खूप वळण बघायची आहेत. माझा सृजन यात्रेच दुसरा अनुभव !!! प्रवास माणसाला खूप काही शिकवून जातो. याची पुन्हा प्रचीती परत आली. मेळघाट म्हटलं की सगळयांना आठवतो महाराष्ट्रतला वेगवेगळ्या प्रश्नांनी व्यापलेला प्रदेश जिथे कुपोषण, बालमृत्यु , वेगवेगळे साथीचे रोग, अंधश्रद्धाळू आदिवासी लोक, शिक्षणाच्या अपुऱ्या सोयी, बंद पडलेल्या शाळा, घनदाट जंगल आणि घाटाचा रस्ता. पण माझ्या नजरेतून पाहिलेला मेळघाट थोडा वेगळा होता. आपल्याकडे नद्या वाहत आहेत पण पाणी प्रदुषित. आपल्याकडे घर आहेत पण त्यात इतरांना प्रवेश नाही. आपल्याकडे पंचतारांकित हॉटेल आहेत पण पौष्टिक आहार नाही. आपल्याकडे आधुनिक वैद्यकीय साधने आहेत पण त्यात गरिबाचे उपचार नाकारले जातात. आपल्याकडे मुलांना शिक्षण दिले जात पण पाचवीचा मुलाला पहिलीच वाचता येत नाही सांगणारा असर अहवाला निघतो. मग मागास कोण ?? आपण का ते असा प्रश्न मनात येवून जातो. सृजन ...