Posts

Image
पाऊली चालती मेळघाट ची वाट !!!  सृजन यात्रा – २०१७ माहित नाही पण मला मेळघाट ने जीवनाचा मेळ कशात आहे याची जाणीव करून दिली तर  घाट सांगून गेला तूला  आयुष्यची खूप वळण बघायची आहेत. माझा सृजन यात्रेच दुसरा अनुभव !!! प्रवास माणसाला खूप काही शिकवून जातो. याची पुन्हा प्रचीती परत आली. मेळघाट म्हटलं की सगळयांना आठवतो महाराष्ट्रतला वेगवेगळ्या प्रश्नांनी व्यापलेला  प्रदेश जिथे  कुपोषण, बालमृत्यु , वेगवेगळे साथीचे रोग, अंधश्रद्धाळू आदिवासी लोक, शिक्षणाच्या अपुऱ्या सोयी, बंद  पडलेल्या शाळा, घनदाट जंगल आणि घाटाचा रस्ता. पण माझ्या नजरेतून पाहिलेला मेळघाट थोडा वेगळा होता. आपल्याकडे नद्या वाहत आहेत पण पाणी प्रदुषित. आपल्याकडे घर आहेत पण त्यात इतरांना प्रवेश नाही. आपल्याकडे पंचतारांकित हॉटेल आहेत पण पौष्टिक आहार नाही. आपल्याकडे आधुनिक वैद्यकीय साधने आहेत पण त्यात गरिबाचे उपचार नाकारले  जातात. आपल्याकडे मुलांना शिक्षण दिले जात पण पाचवीचा मुलाला पहिलीच वाचता येत नाही सांगणारा असर अहवाला निघतो. मग मागास कोण ?? आपण का ते असा प्रश्न मनात येवून जातो. सृजन ...

युवा चेतना शिबीर(निवासी)-२०१७

Image
    युवा चेतना शिबीर(निवासी)-२०१७   मी कडून...आम्ही कडे नेणारा रोमांचकारी प्रवास.. . विद्योदय मुक्तांगण परिवारमार्फत दरवर्षी युवा चेतना निवासी शिबिराचे आयोजन केले जाते.. हे शिबिराचे ३ रे वर्ष होते.. खूप लोक पुस्तके वाचतात पण पण काही माणसे ही वाचण्यासारखी असतात .आयुष्यात काही तरी वेगळे, काहीतरी चांगले करावे, स्वतःसाठी जगताना समाजासाठीसुद्धा काहीतरी करावे असे बऱ्याच जणांना वाटत असते .  आजच्या युवकांना  प्रशासकीय, उद्योजक, संरक्षक व शेती क्षेत्रात यशस्वी झालेल्या व उत्तम कार्य करत असलेल्या व्यक्तीचा जीवन प्रवास समजावा, त्यांचा युवकांशी सवांद व्हावा व त्यांतून युवकांना जीवन जगण्याची दिशा मिळावी या हेतूने युवा चेतना शिबीराचे आयोजन करण्यात आले . हे दोन दिवशीय निवासी शिबीर दि.२७ व २८ मे २०१७ रोजी बालोद्यान या वसतिगृहात पार पडले. सदर शिबीरामध्ये ५० युवकांचा समावेश होता. शिबीराचा थोडक्यात वृत्तांत पुढील प्रमाणे   वकांना सामाजिक दिवस पहिला २७ मे , २०१७     शिबिराचा दिवस म्हणजेच शनिवार २७ मे उजाडला. हळू-हळू शिबिरार्थींची नोंदणी सुरु...

The Hindu Newspaper covered our stroy

http://www.thehindu.com/news/cities/mumbai/Not-by-rote-it%E2%80%99s-all-about-learning-through-fun-and-games/article17308565.ece

सेवांकुर साखर शाळेची सहल..

Image
सेवांकुर साखर शाळेची सहल.. आपल्या साखर शाळेतील मुलांची सहल देशाचं एक अपूर्व देणगी असणाऱ्या खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर व अब्दुल लाट गावातच वंचित मुलांच्या शिक्षणासाठी उभं असलेलं बालोद्यान या वसतिगृहात काढु असं आमच्या टीम ने ठरवलं . सकाळी ठीक   ९.०० वाजता एकत्र या असं सगळ्यांना सांगितलं होतं पण मुलांची उत्सूकता इतकी होती ती सकाळी ७.०० वाजल्यापासून शाळेच्या ठिकाणी उभी होती .कारण विचारल्यावर विठ्ठल म्हणाला  " आई बाबा सकाळी ५ .०० ला ऊस तोडायला गेल्यात आज मी सहलीला जाणार हाय म्हणून आईनं नवे कपडे घातलेत व बाबानं अत्तर लावलय अंगाला येतो का वास..... ?" आम्हाला भारी वाटलं पण काहीजण    सहलीला जाता येणार नाही म्हणून खोपित रडत असताना दिसले.आईनं सांगितलेलं खोपित शेळी हाय तिला सोडून जायचं नाय तिला चारा पाणी करायचं आणि लहान भाऊ पण हाय त्याला सांभाळायचं. या लहान वयात त्या मुलांना आलेलं ही जबाबदारी पाहून त्याचं खेळण्या बागडयांनाच वय कुठंतरी हरवताना दिसलं.                                ...

प्रिंट मिडीयाने घेतली कामाची दखल - कोलाज

Image
मागील वर्षी विविध वृत्त पत्रांनी विद्योदाच्या कामाची दखल घेतली ... 

युवा चेतना शिबिर

Image
युवा चेतना शिबिराविषयी... खूप लोक पुस्तके वाचतात पण पण काही माणसे ही वाचण्यासारखी असतात . माणसे वाचन म्हणजे काय असतं हा नवीन प्रकार समजून घेतलं विद्योदयने आयोजित केलेल्या दोन दिवसाचे २ रे र्जिल्हास्तरीय युवा चेतना शिबिरात !!!! आयुष्यात काहीतरी वेगळे , काहीतरी चांगले करावे, स्वतःसाठी जगताना समाजासाठी सुद्धा काहीतरी करावे . असे खूप जनांना वाटत असते.पण काय करावे हे कळत नसते . कोणतेही जाहिरात न करता फक्त युवकांना प्रत्यक्ष भेटून शिबिराविषयी माहिती देण्यात आली . आणि कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातून ८० युवक- युवतींनी या शिबिराला उपस्थिती लावली. बऱ्याच युवकांना अशाप्रकारेचे हे पहिलेच शिबिर होते. प्रत्येकाच्या मनात सुरवातीला या शिबिरातून काय मिळणार आहे असे अनेक प्रश्न होते पण शिबिर संपल्या नतंर मला कशासाठी जागायचं आहे हे कळाले, मला काहीतरी समाजासाठी करायचा आहे,मला स्वत:ला सिद्ध करायचं आहे अशी मनोगते ऐकण्यावर हे शिबिर यशस्वी झाल्याची पोहोच पावती मिळाली. हे शिबिर हि तसं खूप अनौपचारिक होत. वक्तानां कोणताही विषय तसा दिलेला नव्हता वक्त्याचा विषय म्हणजे काय त्यांनी केलेल्या कामाचे अनुभव कथन ...

हस्ताक्षर सुधार अभियान

Image
महाराष्ट्रातील ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थांचे खराब हस्ताक्षरांमुळे होणारी नुकसान ओळखून आपण हस्ताक्षर सुधार महाअभियाचे आयोजन केले . तरी कोल्हापूर जिल्हात पहिल्या टप्पात शिरोळ व हातकणंगले या तालुक्यातील ५०० विद्यार्थीचे हस्ताक्षर सुधार कार्यशाळा घेण्यात आल्या.