Posts

The Hindu Newspaper covered our stroy

http://www.thehindu.com/news/cities/mumbai/Not-by-rote-it%E2%80%99s-all-about-learning-through-fun-and-games/article17308565.ece

सेवांकुर साखर शाळेची सहल..

Image
सेवांकुर साखर शाळेची सहल.. आपल्या साखर शाळेतील मुलांची सहल देशाचं एक अपूर्व देणगी असणाऱ्या खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर व अब्दुल लाट गावातच वंचित मुलांच्या शिक्षणासाठी उभं असलेलं बालोद्यान या वसतिगृहात काढु असं आमच्या टीम ने ठरवलं . सकाळी ठीक   ९.०० वाजता एकत्र या असं सगळ्यांना सांगितलं होतं पण मुलांची उत्सूकता इतकी होती ती सकाळी ७.०० वाजल्यापासून शाळेच्या ठिकाणी उभी होती .कारण विचारल्यावर विठ्ठल म्हणाला  " आई बाबा सकाळी ५ .०० ला ऊस तोडायला गेल्यात आज मी सहलीला जाणार हाय म्हणून आईनं नवे कपडे घातलेत व बाबानं अत्तर लावलय अंगाला येतो का वास..... ?" आम्हाला भारी वाटलं पण काहीजण    सहलीला जाता येणार नाही म्हणून खोपित रडत असताना दिसले.आईनं सांगितलेलं खोपित शेळी हाय तिला सोडून जायचं नाय तिला चारा पाणी करायचं आणि लहान भाऊ पण हाय त्याला सांभाळायचं. या लहान वयात त्या मुलांना आलेलं ही जबाबदारी पाहून त्याचं खेळण्या बागडयांनाच वय कुठंतरी हरवताना दिसलं.                                ...

प्रिंट मिडीयाने घेतली कामाची दखल - कोलाज

Image
मागील वर्षी विविध वृत्त पत्रांनी विद्योदाच्या कामाची दखल घेतली ... 

युवा चेतना शिबिर

Image
युवा चेतना शिबिराविषयी... खूप लोक पुस्तके वाचतात पण पण काही माणसे ही वाचण्यासारखी असतात . माणसे वाचन म्हणजे काय असतं हा नवीन प्रकार समजून घेतलं विद्योदयने आयोजित केलेल्या दोन दिवसाचे २ रे र्जिल्हास्तरीय युवा चेतना शिबिरात !!!! आयुष्यात काहीतरी वेगळे , काहीतरी चांगले करावे, स्वतःसाठी जगताना समाजासाठी सुद्धा काहीतरी करावे . असे खूप जनांना वाटत असते.पण काय करावे हे कळत नसते . कोणतेही जाहिरात न करता फक्त युवकांना प्रत्यक्ष भेटून शिबिराविषयी माहिती देण्यात आली . आणि कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातून ८० युवक- युवतींनी या शिबिराला उपस्थिती लावली. बऱ्याच युवकांना अशाप्रकारेचे हे पहिलेच शिबिर होते. प्रत्येकाच्या मनात सुरवातीला या शिबिरातून काय मिळणार आहे असे अनेक प्रश्न होते पण शिबिर संपल्या नतंर मला कशासाठी जागायचं आहे हे कळाले, मला काहीतरी समाजासाठी करायचा आहे,मला स्वत:ला सिद्ध करायचं आहे अशी मनोगते ऐकण्यावर हे शिबिर यशस्वी झाल्याची पोहोच पावती मिळाली. हे शिबिर हि तसं खूप अनौपचारिक होत. वक्तानां कोणताही विषय तसा दिलेला नव्हता वक्त्याचा विषय म्हणजे काय त्यांनी केलेल्या कामाचे अनुभव कथन ...

हस्ताक्षर सुधार अभियान

Image
महाराष्ट्रातील ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थांचे खराब हस्ताक्षरांमुळे होणारी नुकसान ओळखून आपण हस्ताक्षर सुधार महाअभियाचे आयोजन केले . तरी कोल्हापूर जिल्हात पहिल्या टप्पात शिरोळ व हातकणंगले या तालुक्यातील ५०० विद्यार्थीचे हस्ताक्षर सुधार कार्यशाळा घेण्यात आल्या.

अक्षरवारी त्रिवेणी संगम- फिरते ग्रंथालय

Image
अक्षरवारी त्रिवेणी संगम विद्योदय मुक्तागण परिवार, कोल्हापूर , सेवा योग प्रतिष्ठान कराड व अनुलोम लोकराज्य अभियान याच्या मार्फत वाचन प्रेरणा दिनानिमित्त अक्षरवारी या फिरत्या ग्रथालायाचे उद्घाटन मा. सौ. प्रतिभा देशमुख याच्या अमृत हस्ते पार पडला. ग्रामीण भागात वाचन संस्कृती रुजावी हाच या फिरत्या ग्रंथालायचा उद्देश आहे. सेवा योग प्रतिष्ठान कराड व अनुलोम लोकराज्य अभियान यांचे यासाठी दिलेले योगदान साठी मनपूर्वक आभार .

संस्कार सेतू निवासी शिबिर

Image
संस्कार सेतू सेवा योग सामाजिक प्रतिष्ठान ही कराड मधील आपली सहयोगी संस्थेमार्फत संस्कार सेतू नावाने अतिशय दुर्गम भाग ,जिंती ( ता. पाटण, जि. सातारा ) येथील एका शाळेत ३ दिवशीय निवाशी शिबिर झाले. या शिबिरात कला व विज्ञान हे विषय घेण्यात आला होता. विज्ञान या विषयाची सत्रे विद्योदय परिवारास देण्यात आली होती. ३ दिवस शिबिरात दाब व ध्वनी या विषयवार विविध प्रयोग व खेळण्यातून मुलांच्या वैज्ञानिक दृष्टीकोन , जिज्ञासा जागृत करण्याचा प्रयन्त करण्यात आला. विद्यार्थीकडून येत असलेली उत्तरे भनाट होती.त्याच्या कडूनच आम्ही खूप काही शिकलो. त्याच्या बुद्धीमत्ता सलाम... चिखलातच कमळ उगवते याची प्रचीती जिंती या गावात आली. सेवायोगी टीम चे आभार त्यांनी विद्योदय परिवारस ही संधी उपलब्ध करून दिली.